Home अर्थजगत रुपये १,७०,००० कोटींचं पॅकेज जाहीर, गरिबांना मिळणार मोफत अन्नधान्य तर गॅस सिलेंडर...

रुपये १,७०,००० कोटींचं पॅकेज जाहीर, गरिबांना मिळणार मोफत अन्नधान्य तर गॅस सिलेंडर सुद्धा मोफत : निर्मला सीतारामन

0

लोकडाऊन मुळे होणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या परिणामांसाठी तसेच हातावर काम करणाऱ्या गरिबांसाठी केंद्र सरकारने पॅकेज ची घोषणा केली.कोरोना व्हायरसचा वाढणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ५० लाख रुपयांचं विमा संरक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली.


कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर त्याचा आर्थिक फटका नागरिकांना बसू नये या दृष्टीकोनातून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय आज घेण्यात आले.
सीतारामन यांनी केलेल्या महत्वाच्या घोषणा:

(१) गरीबांसाठी १ लाख ७० हजार कोटींच्या पॅकेजची केंद्र सरकारकडून घोषणा.

(२)कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येकी ५० लाख रुपयांचा विमा जाहीर केला.यामध्ये डॉक्टर, नर्सेस, आशा सेविका, पॅरामेडिकल स्टाफ यांचा समावेश आहे.

(३) पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत गरीबांना अन्न आणि आर्थिक मदत मिळणार.

(४)शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपयांची रक्कम देणार.एप्रिल महिन्यात पहिल्या आठवड्यात ही रक्कम जमा होईल. सुमारे ८ कोटी शेतकऱ्यांना त्याची मदत होणार.२० कोटी महिला जनधन खातेधारकांना पुढील तीन महिन्यांसाठी दरमहा ५०० रुपये मिळणार.

(५) मनरेगाची मजुरी प्रतिदिन १८२ वरून २०२ रुपयांवर केला गेला.

(६) उज्ज्वला योजनेअंतर्गत ज्या महिलांना गॅस सिलिंडर मिळतो त्यांना पुढचे तीन महिने सिलिंडर पूर्णपणे मोफत देण्यात येतील. जवळपास आठ कोटी महिलांना याचा लाभ मिळेल.

(७) महिला बचत गटांनाही आर्थिक मदत मिळेल. देशात ६३ लाख बचत गट आहेत. या बचत गटांना विनातारण दहा लाख रुपयांचं कर्ज मिळत होतं. ही मर्यादा वाढविण्यात आली आहे.

महिला बचत गटांना २० लाख रुपयांपर्यंतचं कर्ज विनातारण मिळणार.१०० पेक्षा कमी कामगार आहेत आणि पंधरा हजार पेक्षा कमी ज्यांचा पगार कमी आहे, अशा उद्योगांना सरकारकडून मदत. नोकरी करणाऱ्यांचा १२ टक्के आणि नोकरी देणाऱ्यांचा १२ टक्के EPF सरकार देणार आहे.EPF स्किमच्या पैसे काढण्यासाठीच्या तरतूदींमध्येही बदल८० लाख मजूर आणि ४ लाख उद्योगांना याची मदत होण्याची आशा.