कोव्हीड -19 ह्या आजारामुळे प्रभावी आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी रिसर्व्ह बँकेचे अध्यक्ष शक्तीकांत दास यांनी विविध घोषणा केल्या. रेपो रेट ९० बेस पॉईंट नि कमी करत ४% करण्यात आला. रिसर्व्ह बँकेच्या ह्या नवीन घोषणा कालच्या निर्मला सिथारामण यांच्या पॅकेज घोषणेनंतर आधारभूत करण्यात आलेल्या आहेत. उद्भवी भावी जागतिक आर्थिक मंदी आणि त्याद्वारे भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी सदर घोषणा करण्यात आल्या आहेत.
सामान्य माणसाला लॉकडाउन दरम्यान कुठल्याही अडचणींना सामना करता यावा यासाठी कुठल्याही प्रकारच्या कर्ज हफ्ते वसुलीला ३ महिन्यांकरिता स्थगित देत असल्याची घोषणा शक्तीकांत दास यांनी केली.
रिझर्व्ह बँकेतील १५० लोक क्वारंटाईनमध्ये असल्याचंही दास यांनी सांगितलं. जगातील सर्वच देश आर्थिक मंदीतून पुढे जात असून कोरोनामुळे भारताच्या जीडीपीवरही परिणाम होणार आहे. सरकारी बँकांचे व्याजदर कमी करण्यात आले आहेत. व्याजदरात कपात केल्यामुळे सामान्य नागरिकांना त्यांच्या कर्जाचा हप्ता आता कमी भरावा लागणार आहे.
पहा काय म्हणाले रिसर्व्ह बँकेचे गव्हर्नर: