जगभरामध्ये कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. दुसरीकडे कोरोनावरची अद्याप लस शोधता आलेली नाही असे असले तरी काही देशांनी यशस्वी ह्युमन ट्रायल केलं आहे. मात्र पहिल्यांदाच जागतिक आरोग्य संघटना (WHO) कोरोना रुग्णांचा जीव वाचवणारं औषध सापडलं असल्याचं सांगितलं आहे. ब्रिटेनच्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीत डेक्सामेथासोन (dexamethasone) औषधाचा वापर करून 2000 रूग्णांवर उपचार करण्यात आला. या चाचणीत असे आढळले की हे औषध बर्याच रुग्णांचा जीव वाचवण्यात यशस्वी ठरले आहे.
कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी डेक्सॅमेथासोन या औषधाला ब्रिटन सरकारने मान्यता दिली आहे. हे एक जुने आणि स्वस्त औषध आहे.’ प्रमुख संशोधक प्रो. मार्टिन लँड्रे म्हणाले की, ‘आता कोणताही उशीर न करता हॉस्पिटलमधील रुग्णांना हे औषध द्यावे. परंतु लोकांनी हे औषध स्वतः विकत घेऊन खाऊ नये.’
डेक्सॅमेथासोन औषध हे खास करून व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन सपोर्ट असणाऱ्या व्यक्तीसाठी खूप फायदेशीर आहे. या औषधाबाबत जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेसुस म्हणाले की, ‘ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरच्या सपोर्टवर असलेल्या लोकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करणारे हे पहिलेच औषध आहे. ही खूप चांगली बातमी आहे. मी ब्रिटन सरकार आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि इतर लोकांचे अभिनंदन करतो.’