चीनमधील वूहान शहर जे कोरोना चे केंद्र बनले आहे तिथे एक तरुण तोंडाला मास्क घालून ३ किमी पळाल्याने त्याचे फुफ्फुस फुटले आहे.
२६ वर्षीय या तरुणाला वूहान मधील दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे, त्यावर एक मोठी शस्त्रकिया करण्यात आली, त्याला जेव्हा भरती करण्यात आले तेव्हा त्याला श्वसनाचा त्रास होत होता.
फुफ्फुस फुटण्याला pneumothorax असे शास्त्रीय नाव आहे, ज्या वेळी हवा ही फुफुस आणि छातीच्या पोकळीत कैद होते त्यामुळे अशी परिस्थिती उद्भवते. यामुळे श्वास घेण्यात तकलीफ होऊन नंतर फुफ्फुस फुटते.
आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की मास्क किंवा तोंडाला रुमाल बांधून पळल्याने त्याचे फुफ्फुस फुटले असून कोणीही मास्क घालून पळू नये.