Home आरोग्य कोरोनाचा विनाश अशक्य, HIV-AIDS सारखा सदैव अस्तित्वात रहाणार : WHO

कोरोनाचा विनाश अशक्य, HIV-AIDS सारखा सदैव अस्तित्वात रहाणार : WHO

0

युरोपियन संघाने येत्या वर्षभरात वॅक्सिन तयार होणार असल्याचे सांगितले असले तरी जागतिक आरोग्य संघटनेने हा विषाणूचा कधीच नायनाट होणार नसल्याचे भाकीत केले आहे.

जगभरात प्रचंड उलथापालथ घडवलेल्या कोरोना विषाणू ने आतापर्यंत तीन लाखापेक्षा जास्त लोकांचा बळी घेतला आहे. ह्या रोगावर तयार होणारी लस ही सर्वांना उपलब्ध व्हावी अशी मागणी जगातील सर्व नेते करत आहेत.

ज्या देशांमध्ये कोरोना संक्रमण कमी आहे आणि ज्यांनी लॉकडाउन उघडले तिकडे सुद्धा कोरोना संक्रमणाचा दुसरा टप्पा कधीही येऊ शकतो या भीतीने उद्योगधंदे सूरु होऊ शकले नाहीत.

“कोरोना विषाणू रोग हा आपल्या पृथ्वीवर अस्तित्वात असणाऱ्या अनेक रोगांपैकी एक असा झालेला असून, तो आता आपल्यासोबतचं कायमचा राहणार आहे. जगामध्ये HIV चा विषाणू आजही अस्तित्वात आहे, TB चा सुद्धा नायनाट आपण करू शकलो नाही. अगदी त्याचप्रमाणे कोरोना विषाणू सुद्धा नायनाट न होता आपल्यामध्ये राहील. फक्त या विषाणूचा प्रसार आपण रोखू शकतो”, असे जागतिक आरोग्य संघटनेचे आपत्कालीन संचालक मायकेल रयान यांनी सांगितले.