Home माहितीपूर्ण मृत्यू नंतर एक वर्षा पर्यंत शरीरात सुरु राहतात हालचाली, मृत्यू नंतर...

मृत्यू नंतर एक वर्षा पर्यंत शरीरात सुरु राहतात हालचाली, मृत्यू नंतर शरीरात काय होतात बदल ?

0
humen body

प्राईम नेटवर्क : मृत्यू पश्चात एका वर्षा पर्यंत चालू राहतात शारीरिक हालचाली, आश्चर्य वाटलं ना ! हो पण हे खरं आहे, चला तर मग पाहुयात, मृत्यू नंतर शरीरात काय बदल होतात ? मृत्यू नंतर कशा ? आणि केव्हा पर्यंत हालचाली सुरु राहतात ? म्हणजेच मृत्यू नंतरचा मानवी शरीराचा प्रवास…

मृत्यू हे एकमेव जगातलं सर्वात मोठं रहस्य आहे ज्याला कुणीच चुकूवू शकत नाही. पृथ्वीतलावर जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाला एक ना एक दिवस स्वतःला मृत्यूच्या स्वाधीन करावंच लागतं. हे कोणालाच ठाऊक नाही की मृत्यू पश्चात काय होतं. अर्थात काही लोक पुनर्जन्म वगैरे सारखे दावे करतात, मात्र त्या बद्दल वैज्ञानिक दृष्ट्या कुठलेली ठोस पुरावे मिळालेले नाहीत. मृत्यू संदर्भात जगभर वैज्ञानिक अभ्यास करत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी अशाच काही वैज्ञानिकांना लागलेला शोध आश्चर्यचकित करणारा आहे. एका वैज्ञानिकाच्या संशोधना नुसार मृत्यूनंतर ही मृत शरीरात हालचाली होत असतात; त्या ही तब्बल एका वर्षा पर्यंत !

यावर विश्वास ठेवणं अवघड असलं तरी अमेरिकेतील वैज्ञानिक एलीसन विल्सन व त्याच्या टीमने दावा केला आहे की, ‘ह्युमन बॉडी मृत्यूनंतर ही एका वर्षा पर्यंत हालचाल करत राहते.’ या रिसर्चमध्ये १७ महिने एका मृत शरीरावर रिसर्च करण्यात आला. यात १७ महिने मृत शरीराला हायटेक कॅमेऱ्याच्या निदर्शनात ठेवण्यात आले व याच कॅमेऱ्यात बॉडीच्या हालचाली कैद झाल्या आहेत. एलीसनच्या टीमने दर ३० मिनिटांनी बॉडीचा एक फोटो घेतला आणि तब्बल १७ महिन्या नंतर जेव्हा हे सर्व फोटोग्राफ्स एकत्र आले तेव्हा डेड बॉडीत सातत्याने झालेले बदल निदर्शनास आले.

विल्सनला सुरुवातीला वाटलं की बॉडी सडत आहे म्हणून कदाचित या हालचाली होत आहेत. मात्र देह पूर्णपणे सुकल्या नंतर ही या हालचाली होतच होत्या. त्यांनी ही बॉडी एका निर्जन ठिकाणी ठेवली होती व विल्सनची टीम कायम या बॉडीवर नजर ठेऊन होती. वैज्ञानिकांनी सांगितलं की या शोधामुळे माणसाचा मृत्यू नक्की कधी झाला आहे हे आता त्वरित व दावेशीर सांगता येईल, ज्याची भविष्यात पोलिसांना ही मोठी मदत होऊ शकते.

बऱ्याच लोकांची मान्यता आहे की मृत्यूनंतर आपलं शरीर निर्जीव होतं, मात्र हे खोटं आहे. मृत्यूपश्चात कित्येक तास महत्वाची मानवी अंगे कार्यरत असतात. अवयव ट्रांसप्लांट करणारे डॉक्टर्स सांगतात की मृत्यनंतर अर्ध्या तासाच्या आत हे मानवी अंग काढून सहा तासाच्या आत एखाद्या गरजू व्यक्तीच्या शरीरात ट्रांसप्लांट केल्यास एखाद्या माणसाला जीवदान मिळू शकतं.

मृत्यू म्हणजे शरीर निर्जीव होणे नाही. मानवी मृत्यू नंतर हृदयाचे ठोके बंद होतात, परिणामी मेंदूला जाणारा ऑक्सीजन बंद होतो व पुढील पाच मिनिटांत शरीरभर ऑक्सिजनची कमी भासू लागते. त्यामुळे कोशिका मरू लागतात. या स्थितीला ‘पॉईंट ऑफ नो रिटर्न’ म्हणतात. म्हणजेच याला मृत्यू असं संबोधतात.

हे सुद्धा वाचा :