Home माहितीपूर्ण सहा वर्षांचा मुलगा पडला २०० फूट खोल बोअरवेलमध्ये: वाचून अंगावर काटा येईल…

सहा वर्षांचा मुलगा पडला २०० फूट खोल बोअरवेलमध्ये: वाचून अंगावर काटा येईल…

0

आज सकाळी कळवणच्या बेज येथे खेळत-खेळता एक मुलगा २०० फूट खोल बोरवेल मध्ये पडला. रितेश सोळुंकी असे या मुलाचे नाव असून तो आई वडिलांसोबत शेतात गेला होता. रितेशचे आईवडील मुळचे मध्यप्रदेशातील सेंधवा येथील रहिवासी आहेत व शेतमजूरीसाठी बेज गावात आले होते.

आईवडील शेतात काम करत असतांना रितेश एकटा खेळत होता. खेळतांना अचानक तो शेतातील सुमारे दोनशे फूट खोल असलेल्या बोअरवेलमध्ये पडला. रितेश बोअरवेलमध्ये पडल्याची माहिती मिळताच सर्वत्र धावपळ उडाली. पोलीस व स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन युद्ध पातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. रितेश सुमारे ५० फूट खाली अडकलेला होता. सुरुवातीला बोअरवेलच्या शेजारी  जेसीबीने खोदकाम करून दोरीच्या साहाय्याने रितेशला सुखरूप  बाहेर काढण्यात आले. आता रितेशवर कळवण  उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आल्याचं डॉक्टर सांगत आहेत. रितेशला सुखरूप पाहिल्यानंतर कुठे त्याच्या आईवडिलांच्या जीवात जीव आला.