Home महाराष्ट्र १५ दिवसात दीड लाख परप्रांतीय मजूर राज्यात वापस, मराठी कामगार अजूनही दिवास्वप्नात

१५ दिवसात दीड लाख परप्रांतीय मजूर राज्यात वापस, मराठी कामगार अजूनही दिवास्वप्नात

0

श्रमिक स्पेशल ट्रेनने राज्यातून बाहेर जाणाऱ्या आणि तिकिटाचे पैसे नसणाऱ्या परप्रांतीय मजुरांची महाराष्ट्रात पुन्हा entry होत आहे, गेल्या १५ दिवसात दीड लाख लोक महाराष्ट्रात परतले आहेत. एकीकडे महाराष्ट्रातील लोक परप्रांतीय गेले आता मराठी माणसांना रोजगार उपलब्ध होणार या दिवास्वप्नात आहेत मात्र दुसरीकडे कंपन्या, उद्योगांना परप्रांतीय प्रेम काही राहू देत नाही. लाखोंच्या संख्येने मजुरांना परराज्यातून वापस बोलवण्यापेक्षा इथल्या मराठी माणसांना का बरे रोजगार उपलब्ध करून दिला जात नाही ही गंभीर बाब आहे.

लॉकडाऊननंतर परप्रांतीय मजूर मोठ्या प्रमाणात त्यांच्या राज्यात गेले. तब्बल ८४४ रेल्वेगाड्यांद्वारे १२ लाख ५ हजार मजूर स्वगृही परतले. मुंबई, ठाणे, नाशिक, पुण्यासह राज्यातील उद्योग पुन्हा सुरू करण्यासाठी येथील उद्योगांना परराज्यातील मजुरांना परत बोलावणे हा उपाय सोयीचा वाटू लागला आहे. सुरुवातीला परराज्यांमधून अत्यंत कमी मजूर येत होते, पण गेल्या काही दिवसात लक्षणीय वाढ होत आहे. मुंबई, ठाणे व पालघर येथे २७९ रेल्वे गाड्यांमधून एक लाख मजुरांची वापसी झाली.

पंधरा दिवसातले हे आकडे बघून अगदी काही महिन्यांमध्येच मुंबई पुणे सारखी रोजगार निर्मिती केंद्रे परत एकदा परप्रांतीय मजुरांनी गजबजून जातील, इथल्या उद्योगधंदे, कंपन्यांना चालवणारे महाराष्ट्रातील मजुरांना रोजगार देण्याऐवजी परप्रांतीय मजुरांना परत बोलवून घेणे का सोयीचे ठेवतात याचा शोध घेणे आवश्यक आहे. एका रिपोर्ट नुसार परराज्यातील मजूर हे कमी दामात जास्त काम करून देतात तसेच त्यांची कामादरम्यान सहनशीलता जास्त असते तर महाराष्ट्रीय मजुरांचा याबाबतीत उलटा प्रभाव पडतो. महाराष्ट्रातील युवकांना सुदधा रोजगाराची अत्यंत गरज असून त्यांनी आपले कार्यकौशल्य कसे दाखवता येईल याचे विश्लेषण करत सद्याच्या संधीचा फायदा घेतला पाहिजे कारण वेळ अजून गेलेली नाही.