Home महाराष्ट्र ११वीची प्रवेशप्रक्रिया मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे पडली लांबणीवर

११वीची प्रवेशप्रक्रिया मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे पडली लांबणीवर

0

कित्येक वर्षांच्या संघर्षानंतर महाराष्ट्रात मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. याचा परिणाम राज्यातील शिक्षण क्षेत्रावर होतांना दिसत आहे. काही दिवसांनी चालू होणार असलेली व कोरोनामुळे आधीच लांबणीवर पडलेली इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया मराठा आरक्षणाचा स्थगिती दिल्यामुळे आणखी लांबणीवर पडली आहे.

याबाबत उद्या दिनांक १५ सप्टेंबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच इतर काही नेत्यांची बैठक होणार असून त्यात निर्णय घेतला जाणार आहे. तसेच याआधी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत न्यायालयाची स्थगिती उठवण्यासाठी एकजुटीने प्रयत्न केला जाईल असा निर्णय घेण्यात आला.