Home महाराष्ट्र शिवसेनेच्या २८ नगरसेवकांचा एकाच वेळी राजीनामा

शिवसेनेच्या २८ नगरसेवकांचा एकाच वेळी राजीनामा

0

विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीची घोषणा झाल्यानंतर दोन्ही पक्षांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर झाल्या. या याद्यांमध्ये नाव न आल्याने म्हणजेच उमेदवारी न मिळाल्याने बऱ्याच नेत्यांनी नाखूष होऊन बंड पुकारले. शिवसेना बंडखोर धनंजय बोडारे या उमेदवारासह मुंबईतील शिवसेनेच्या २८ नगरसेवकांनी राजीनामा दिल्याची बातमी समोर आली आहे.

कल्याण पूर्व मतदारसंघात गणपत गायकवाड या भाजप उमेदवाराला उमेदवारी देण्यात आल्यामुळे तेथील शिवसैनिक बंडखोरी करत आहेत. कल्याण पूर्व मतदारसंघात धनंजय बोडारे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. तर त्यांच्यासह उल्हासनगर मधील शिवसेनेच्या १० नगरसेवकांनी तर कल्याण-डोंबिवली मधील १८ नगरसेवक तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे असे मीडिया न्यूज मधून समजले.