Home महाराष्ट्र अकोल्यात २ महिन्यात ३५ मुली बेपत्ता, जिल्हा पोलिस अध्यक्षांची तडकाफडकी बदली

अकोल्यात २ महिन्यात ३५ मुली बेपत्ता, जिल्हा पोलिस अध्यक्षांची तडकाफडकी बदली

0


अकोला जिल्ह्यामधील बेपत्ता मुलींचा तपास प्रकरणात निष्काळजीपणा केल्यामुळे २ पोलीस अधिकारी निलंबित केले असून पोलीस अध्यक्षांची बदली करण्यात आली आहे असे राज्य गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संचार माध्यमांना सांगितले. अकोल्याचे रहिवासी किरण ठाकूर यांची मुलगी सहा महिन्यांपासून बेपत्ता असून, त्यांनी पोलिसात धाव घेतली असताना पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. नंतर तपास करण्यास सुद्धा टाळाटाळ केली. या संदर्भात किरण ठाकूर यांनी नागपूर खंडपीठात तक्रार दाखल केली व मुलगी अल्पवयीन असल्यामुळे तिला तात्काळ हजर करावे अशी मागणी मागितली. त्यांना पोलीस अध्यक्षांच्या धमक्या सुद्धा येत होत्या असे ठाकूर म्हणाले. दरम्यान राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत अकोला सिव्हिल लाइन पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी भानूप्रसाद मढावी आणि श्रीमती कराळे यांना आज निलंबित केले आहे. या दोघांवर तपासकामात हयगय केल्याचा ठपका ठेवण्यात आला. तसेच या दोघांवर लक्ष न ठेवल्यामुळे पोलीस अध्यक्षांची बदली केली.


महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार अकोला जिल्ह्यात मागील २ महिन्यात दरम्यान तब्बल ३५ मुली बेपत्ता झाल्या असून त्यापैकी एकाही मुलीचा शोध पोलिसांना लागलेला नाही.