Home महाराष्ट्र नाशिक शिवसेनेला युती पडली महागात: ३५० पदाधिकाऱ्यांसह ३६ नगरसेवकांनी दिले राजीनामे

शिवसेनेला युती पडली महागात: ३५० पदाधिकाऱ्यांसह ३६ नगरसेवकांनी दिले राजीनामे

0

भाजप-शिवसेना युतीवर अधिकृतपणे शिकामोर्तब झाला असला तरी अजूनही महाराष्ट्रात ठिकठिकाणी शिवसैनिक, शिवसेना कार्यकर्ते, पदासधिकारी व नेतेमंडळी निराशा व्यक्त करीत आहेत. त्यातल्या त्यात नाशिक मध्ये भाजप-शिवसेना युतीला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या तब्बल ३५० पदाधिकाऱ्यांसह ३६ नगरसेवकांनी राजीनामे दिले असून शिवसेना कार्यकर्त्यांच्या राजीनाम्यांमुळे नाशिकमध्ये भाजपला झटका बसला या काही शंका नाही. मीडिया न्यूज नुसार नाशिक पश्चिममधील शिवसेनेची बंडखोरी रोखून नेत्यांची मनधरणी करण्यात भाजप नेते आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांना अपयश आलं आहे. सिंधुदुर्गानंतर आता नाशिकमध्येही शिवसेना-भाजप युती संकटात आली आहे. याचे पुढे काय परिणाम होतील ते दिसेलच.

हाती आलेल्या सविस्तर बातमी नुसार नाशिक पश्चिमची जागा भाजपला सोडली होती. मात्र भाजपच्या आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे यांनी बंडखोरी केली आहे. या मतदारसंघात भाजपने घुसखोरी केल्याचं सांगत शिंदेंच्या समर्थनार्थ शिवसेनेचे महानगर प्रमुख, पालिकेतील विरोधी पक्षनेते आणि ३५ नगरसेवकांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पदाचे राजीनामे दिले आहेत अशी माहिती मिळत आहे. एकाच वेळी नगरसेवकांनी दिलेले राजीनामे आणि संतप्त शिवसैनिक यांच्यात भाजप आमदार सीमा हिरे यांच्या अडचणी वाढणार आहेत. या बंडखोरीवर लगाम देण्यासाठी व शिवसेनेची मनधरणी करण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन सोमवारी नाशिकमध्ये दाखल झाले होते. मात्र त्याचा काहीही एक उपयोग झाला नाही, त्यांनी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांशी संपर्क सुरू केला मात्र कुणीही माघार घेतली नाही.