Home महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये ४५० पोलिसांना कोरोणाची लागण, एकट्या मुंबईत १०० पोलीस पॉसिटीव्ह

महाराष्ट्रामध्ये ४५० पोलिसांना कोरोणाची लागण, एकट्या मुंबईत १०० पोलीस पॉसिटीव्ह

0

राज्यात कोरोना रोगाच्या विळख्यात सापडलेल्या पोलिसकर्मींची संख्या ४०० च्या पार पोचली आहे. महाराष्ट्रात पोलीस दलामध्ये कार्यरत असणाऱ्या तर कोरोणाची लागण झालेल्यांची संख्या ही ४५७ एवढी झालेली आहे यामध्ये ४८ मोठे पोलीस अधिकारी तर ४०९ शिपायांचा समावेश आहे.

मुंबईमध्ये एका IPS अधिकाऱ्यांना कोरोना झाल्याचे उघडकीस आल्यानंतर जेव्हा त्यांच्या संपूर्ण टीम ची चाचणी करण्यात आली, त्यावेळी त्यातले बहुतांश लोक हे COVID19 पॉसिटीव्ह आढळले. या IPS अधिकाऱ्यांच्या प्रकरणानंतर अधिक अधिकाऱ्यांच्या टेस्ट घेण्यात आल्या आणि त्यांचे परिणाम अद्याप येणे बाकी आहे.

कोरोना विषाणूशी मुकाबला करण्यासाठी पोलीस आपल्या सेवेत सदैव तत्पर आहेत. कोरोना विषाणू रुग्ण ज्या भागात जास्त आहेत अशा भागांमध्ये आपले कर्तव्य बजावत असताना दुर्दैवाने कोरोनासोबत पोलिसांचा संपर्क येतो. आजपर्यत अशाच ४ कर्तृत्ववान पोलिसकर्मींचा मृत्यू कोरोनाशी दोन हाथ करतांना झाला आहे. पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना योग्य ती वैद्यकीय मदत तसेच सरंक्षक साहित्य (PPE किट) कुठेच कमी पडू देऊ नका अशी मागणी सर्वत्र होत आहे.