Home महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले हे ७ महत्वाचे निर्णय; एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या

मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले हे ७ महत्वाचे निर्णय; एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या

0

आज २६ ऑगस्टला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत काही अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यातील एक महत्वाचा निर्णय म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत असे लोकमतच्या मीडिया न्यूजवरून समजले.

मंत्रिमंडळ बैठकीतील इतर महत्वाचे निर्णय :

  • शहरी भागातील आरोग्य सेवेसाठी संचालक, उपसंचालक, सहाय्यक संचालक या पदांचा समावेश करण्यात आला असून ७ नियमित पदांच्या निर्मितीसाठी मान्यता देण्यात आली
  • राज्यातील मच्छिमारांना विशेष अनुदान देण्यास मंत्रीमंडळाकडून मान्यता मिळाली
  • मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील ८ महानगपालिका आणि ७ नगरपालिका या क्षेत्रांतील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन प्राधिकरण स्थापन करण्यास मान्यता दिली
  • वार्षिक कर भरणाऱ्या सार्वजनिक आणि मालवाहतूक वाहनांना १ एप्रिल पासून ३० सप्टेंबर पर्यंतच्या कालावधीसाठी करातून मुक्तता देण्यात आली आहे.
  • लॉकडाउनमुळे अतिरिक्त होत असलेल्या दुधापैकी १० लाख लिटर दूध प्रतिदिन स्वीकारण्यास मान्यता देण्यात आली

याव्यतिरिक्त काही महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले.