सानिका नामदेव माळी हिचे इयत्ता १०वीच्या येत्या परीक्षेत पहिला क्रमांक पटकवायचे स्वप्न होते. पण वर्गावरील शिक्षकानेच तिच्या पिण्याच्या पाण्यात विष कालवल्याने तिची जीवनयात्रा संपली. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना घडली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात. सानिकाला कीटकनाशकाची बाटली आणून देणारा शिक्षक म्हणजे निलेश बाळू प्रधाने, याला पोलिसांनी अटक केली आहे.
सानिका माळी दहावीत शिकत होती. २० फेब्रुवारी रोजी प्रॅक्टिकल सुरू असतांनाच पाणी पिल्याने सानिका चक्कर येऊन पडली. त्यानंतर तिला दवाखान्यात दाखल केल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेनंतर सानिकाच्या वडिलांनी पोलिसांमध्ये फिर्याद नोंदवली ज्यामध्ये सानिकाला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पोलिसांनी सानिका सोबतच्या ५ मुलीची फिर्याद नोंदवली असता संशयाची सुई शिक्षक प्रधाने वर होती. पोलिसांच्या प्रथम तपासानंतर असे कळले की सानिका ही हुशार होती व तिला प्रथम क्रमांक मिळवायचा होता. पण तिला त्याची शास्वती नसल्याने तिला आजारी पडायचे होते. दरम्यान शिक्षक प्रधाने याने तिला आजारी पडण्यासाठी कीटकनाशक आणून दिले. हेच कीटकनाशक प्राशन करून सानिकाचा मृत्यू झाला आहे.