Home महाराष्ट्र लोणावळा पोस्ट ऑफिसमध्ये आले चक्क गांजाचे पार्सल; संबंधित आरोपींना अटक

लोणावळा पोस्ट ऑफिसमध्ये आले चक्क गांजाचे पार्सल; संबंधित आरोपींना अटक

0

एनसीबी अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबईतील पथकाने गेल्या शनिवारी १७ ऑक्टोबरला लोणावळा पोस्ट ऑफिसमध्ये आलेले गांजाचे पार्सल जप्त केले आहे. लोकमतच्या मीडिया न्यूजनुसार एनसीबीच्या टीमला लोणावळा पोस्ट ऑफिसमध्ये गांजाचे पार्सल येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे एनसीबीने लोणावळा पोस्ट ऑफिसला भेट दिली तर त्यांना तिथे १०३६ ग्राम व ७४ ग्राम अशा वजनाचे गांजाचे पार्सल्स आढळले व ते त्यांनी जप्त केले.

पुढील तपासातून एनसीबीला या प्रकरणाशी संबंधित २ आरोपींची माहिती मिळाली व त्यांना ताब्यात घेण्यात आले. श्रीमय शहा, वय २६ व ओमप्रकाश तुपे, वय २८ अशी या दोन आरोपींची नावे आहेत. एनसीबीने प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या माहितीनुसार हा गांजा कॅनडावरून आला असून आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार ५० ते ५५ लाखांपर्यंतच्या किमतीचा गांजा लोणावळ्यातून जप्त करण्यात आला आहे. तसेच हा गांजा कोणाच्या पत्त्यावर आला होता व कसा पाठवण्यात आला याबाबतचा तपास एनसीबी करीत आहे.