Home महाराष्ट्र आदित्य ठाकरे या मतदार संघातून निवडणूक लढवतील आमदार अनिल परब यांनी केलं...

आदित्य ठाकरे या मतदार संघातून निवडणूक लढवतील आमदार अनिल परब यांनी केलं जाहीर

0

प्राईम नेटवर्क : गेल्या काही दिवसां पासून युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यांना पक्षाकडून थेट मुख्यमंत्री किंवा उपमुख्य मंत्री करण्याची तयारी असल्याचं समजतंय. शिवसेनेचे चाणक्य समजले जाणारे आमदार अनिल परब यांच्या कडून हि घोषणा केली गेली आहे, ते वरळीच्या गट प्रमुखांच्या बैठकीत यावेळी बोलत होते. आदित्य ठाकरे हे वरळी मतदार संघातून निवडणूक लढवतील असं आमदार अनिल परब यांनी जाहीर केलं आहे.

काही दिवसां पासून आदित्य ठाकरे निवडणूक लढण्याची चर्चा होती, अनिल परब यांच्या घोषणेमुळे आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित झालं आहे. असं झाल्यास ठाकरे घराण्यातील आदित्य ठाकरे हे पहिले नेते असतील जे निवडणूक लढवतील, २०१४ च्या विधानसभेला राज ठाकरेंनी भावनिक आवाहन करत म्हटलं होतं कि जर मनसेला बहुमत मिळालं तर, मी स्वतः मुख्यमंत्री पदाचा दावेदार असेल, मात्र याचवेळी पलटवार करत शिवसेने कडून उद्धव ठाकरेंनी शिवसेनेला बहुमत मिळाल्यास आपण स्वतः मुख्यमंत्री पदाचे दावेदार असणार, असं जाहीर केलं होत, मात्र यावेळी दोघांनाही बहुमत न मिळता, भाजप सत्तेच्या जवळपास पोहचला होता आणि त्यांना बहुमतासाठी दुसऱ्याचा आधार घ्यावा लागला. यामुळे राज आणि उद्धव या दोघांच्या हि मुख्यमंत्री पदाच्या घोषणा हवेतच विरल्या.

विद्यमान आमदार सुनील शिंदे, सचिन अहिर यांनी अनिल परब यांच्या घोषणेचा स्वागत केलं, आदित्य ठाकरे निवडणूक लढल्यास वरळीतून १ लाखापेक्षा जास्त मतांनी त्यांना निवडून आणणार अशी घोषणा देखील त्यांच्या कडून करण्यात आली. यावेळी शिवसेना गटप्रमुखांच्या बैठकीला खासदार धैर्टशील माने, आमदार सुनील शिंदे, सचिन अहिर, उपस्थित होते, आदित्य ठाकरे निवडणूक लढल्यास ठाकरे कुटुंबियातील निवडणूक लढवणारी पहिले सदस्य ठरणार आहेत.