Home महाराष्ट्र ‘आरेतील झाडांना हात लावू नका!’ – आदित्य ठाकरे

‘आरेतील झाडांना हात लावू नका!’ – आदित्य ठाकरे

0
Aditya Thackeray

मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळ अर्थात एमएमआरडीएने आरेच्या जंगलातील दोन हजारांहून अधिक झाडे कापून तिथे मेट्रो शेड उभारण्याचा निर्णय घेतला असल्याची निराशाजनक बातमी आपल्या कानांवर गेल्या आठवड्यापासून पडत आहे. मुंबईतील बऱ्याच नागरिकांनी, राजकीय नेत्यांनी तसेच फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांनीही या निर्णयाला कडाडून विरोध केला असूनही एमएमआरडीए आपला निर्णय मागे घेण्यास तयार नाही. शिवसेनेने देखील यावर आपली भूमिका स्पष्ट करीत ‘मुंबईच्या पर्यावरणाच्या बाबतीत कोणीही मनमानी करू शकत नाही’ असे ठणकावून सांगितले.

आज शिवसेना भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, शिवसेनेचा मेट्रोला विरोध नाही तर आरेमध्ये झाडे तोडून होणाऱ्या कारशेडला विरोध आहे. या विरोधामागे कुठलंही राजकारण नसून एक मुंबईकर तसेच पर्यावरणप्रेमी म्हणून आपली ही भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ‘मुंबईतील लोकांसाठी मेट्रो जितकी आवश्यक आहे तितकीच आरेतील जैवविविधतेसाठी झाडेही आवश्यक आहेत’ असे मत त्यांनी मांडले.