Home महाराष्ट्र परीक्षा पुढे ढकलण्यासाठी आदित्य ठाकरेंचे नरेंद्र मोदींना पत्र

परीक्षा पुढे ढकलण्यासाठी आदित्य ठाकरेंचे नरेंद्र मोदींना पत्र

0

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसतांनाही अनेक कोर्सेसच्या अंतिम वर्षाच्या तसेच पात्रता परीक्षा पुढे न ढकलता लवकरच घेण्याचा काही विद्यापीठांचा विचार सुरू आहे. परीक्षा प्रत्यक्षात झाल्या तर विद्यार्थ्यांना तसेच पालकांनाही कोरोनाचे संक्रमण होण्याचा धोका आहे. अशा परिस्थितीत प्रत्यक्ष, ऑनलाईन अशा सर्व परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती करण्यासाठी महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे.

या पत्रात आदित्य ठाकरेंनी देशातील कोरोनाच्या सद्यस्थितीबद्दल सांगून त्यावर पंतप्रधानांच्याच नेतृत्वाखाली उपाययोजना चालू आहेत असे नमूद केले. तसेच काही विद्यापीठे लवकरच परीक्षा घेण्याचा विचार करत आहेत. परंतु इतर देशांमध्ये शाळा, कॉलेजेस उघडल्यानंतर कोरोना रुग्णांमध्ये वाढ दिसून आली असेही त्यांनी पत्रात नमूद केले. याशिवाय नवीन शैक्षणिक सत्र जानेवारी २०२१ मध्ये सुरू करता येईल असा प्रस्तावही त्यांनी या पत्रात व्यक्त केला.

आदित्य ठाकरेंनी ट्विट करून या पत्राबद्दलची माहिती दिली.