Home महाराष्ट्र १५ जुलै पर्यंत दहावीचा निकाल लागो अथवा ना लागो ११वीचे प्रवेश सुरू...

१५ जुलै पर्यंत दहावीचा निकाल लागो अथवा ना लागो ११वीचे प्रवेश सुरू होणार : पुणे शिक्षण उपसंचालक कार्यालय

0

पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने आज केंद्रीय पध्दतीनुसार अकरावीच्या प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी माहिती सांगितली आहे. आजपासून कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या संस्थेची नोंदणी संकेतस्थळावर करण्यास सुरुवात करावी तसेच विद्यार्थ्यांचे प्रवेश हे १५जुलै पासून सुरू करण्यात येईल असे जाहीर केले.

कोरोनामुळे ११वीचे प्रवेश हे केंद्रीय पद्धतीने करू नयेत अशी मागणी अनेक दिवसांपासून सर्व संस्था करत आहेत मात्र ही मागणी मान्य न करता कार्यालयाने केंद्रीय पद्धतीनेच प्रवेश होतील असे जाहीर केले. www.dydepune.com या संकेतस्थळावर या बद्दल सर्व माहिती उपलब्ध असून प्रवेश प्रक्रिया कशा घेतल्या जातील याविषयी अगदी तपशीलवार माहिती देण्यात आली आहे यासोबतच https://pune.11thadmission.org.in सदर संकेतस्थळ सुद्धा सुरू करण्यात आले आहे.

कसे आहे वेळापत्रक

जुलै ०२ ते १५ : संस्थांची नोंदणी आणि सोबत माहिती तपासणी.

जुलै १५ ते दहावी निकाल येईपर्यंत : विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करणे, प्रवेश अर्ज भाग एक भरणे, मार्गदर्शन केंद्र निवडणे, अर्ज मंजूर झाला आहे याची खात्री करणे आणि माहिती पडताळून पाहणे

दहावीचा निकाल लागल्यानंतर:विद्यार्थ्यांनी भाग २ (पसंतीक्रम) भरणे व अर्ज सबमिट करणे (भाग १ सह)