Home महाराष्ट्र आरे वृक्षतोडीचा निषेध करण्यासाठी गेलेले प्रकाश आंबेडकर पोलिसांच्या ताब्यात…

आरे वृक्षतोडीचा निषेध करण्यासाठी गेलेले प्रकाश आंबेडकर पोलिसांच्या ताब्यात…

0

मुंबईतील आरे परिसरात मेट्रो कारशेड उभारण्यासाठी करण्यात येणाऱ्या वृक्षतोडीसाठी हायकोर्टाने मान्यता दिली असून तेथील झाडे कापायला सुरुवात झाली आहे हे आपण ऐकले. वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या पर्यावरणप्रेमी लोकांना अडवण्यासाठी आरे परिसरात मुंबई पोलीस गस्त घालून आहेत. तसेच या परिसरात सरकारने कलम १४४ लागू केला असून जमावबंदी केली आहे. त्यामुळे वृक्षतोडीचा निषेध करण्यासाठी आरे परिसरात येणाऱ्या आंदोलकांना पोलीस ताब्यात घेत असून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनादेखील याच प्रकरणी काल पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

‘आरेमधील वृक्षतोडीच्या निषेधार्थ आरे परिसरात गेलो असता पोलिसांनी मला ताब्यात घेऊन पवई पोलीस स्टेशनला आणले असून अटक केलेले नाही’ अशी माहिती आंबेडकरांनी काल दुपारी ट्विटद्वारे दिली. याशिवाय अफवांवर विश्वास न ठेवता कायदा व सुव्यवस्था पाळण्याचे आव्हान त्यांनी जनतेला केले.