Home महाराष्ट्र फडणवीसांच्या राजीनाम्यानंतर ‘वहिनीसाहेब’ म्हणाल्या, “मी पुन्हा येईल!”

फडणवीसांच्या राजीनाम्यानंतर ‘वहिनीसाहेब’ म्हणाल्या, “मी पुन्हा येईल!”

0

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी सगळे विक्रमच तोडले. कारण फडणवीस असे हिले मुख्यमंत्री होते जे वसंतदादा नाईक यांच्यानंतर सलग पाच वर्षे मुख्यमंत्री पदावर होते आणि सर्वात मोठा विक्रम म्हणजे आजपर्यंतचा सर्वात कमी कार्यकाळ असणारा मुख्यमंत्री बनून केवळ साडेतीन दिवसात त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. भाजपचं सरकार कोसळल्यानंतर फडणवीस यांच्या पत्नी अर्थात महाराष्ट्राच्या लाडक्या वहिनी अमृता फडणवीस आपल्या भावना सोशल मीडियावर शायरीद्वारे व्यक्त करत म्हणाल्या ‘मी पुन्हा येईल’.

अमृता फडणवीस यांचं ट्विट पुढील प्रमाणे

“पलट के आऊंगी शाखों पे खुशबुएँ लेकर,
खिज़ां की ज़द में हूँ मौसम ज़रा बदलने दे! Thanks Mah for memorable 5yrs as your वहिनी ! The love showered by you will always make me nostalgic! I tried to perform my role to best of my abilities-with desire only to serve & make a positive diff” असं अमृता फडणवीस यांनी म्हटलंय.

त्यांनी लिहिलेल्या दोन ओळींच्या हिंदी शायरी वरून ‘त्या पुन्हा येणाचा’ उल्लेख करत आहेत. ‘योग्य वेळ आल्यानंतर मी पुन्हा येईल’ सोबतच त्या इंग्रजीत म्हणतात, “तुमची वहिनी म्हणून पाच वर्ष भरभरून प्रेम दिल्याबद्दल महाराष्ट्राचे खूप खूप आभार! तुमचं प्रेम सदैव माझ्या आठवणीत राहील.” असं ट्विट करून त्यांनी महाराष्ट्राचे आभार मानले.