Home महाराष्ट्र …अजित पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपदा वरून हकालपट्टी, आता कसे सिद्ध करणार...

…अजित पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपदा वरून हकालपट्टी, आता कसे सिद्ध करणार बहुमत?

0

प्रसार माध्यमांद्वारे मिळत असलेल्या माहिती नुसार विधीमंडळ पक्षनेतेपदावरून अजित पवार यांची राष्ट्रवादीकडून हकालपट्टी करण्यात आली आहे. अजित पवार यांनी भाजपशी हात मिळवणी करून आज पहाटे अर्थात शनिवारी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांनी कुणालाही कुठलीही कल्पना न देता अशी पक्षविरोधी भूमिका घेतल्याने परिणामी त्यांची हकालपट्टी करण्यात आली असे सांगण्यात येत आहे. पक्ष प्रमुख शरद पवार यांनी स्वतः ट्विट करून अजित पवार यांना पाठींबा देण्यास नकार दिला

राजकीय वर्तुळात आज पवार कुटूंबाचीच चर्चा चालू असून सुप्रिया सुळे यांनी ‘अजित पावरांशी समंध संपले’ असं सांगितलं आहे. आता राष्ट्रवादीच्या मदतीशिवाय अजित पवार किती आमदार जमवू शकतील आणि बहुमत सिद्ध करू शकतील का? यावर सबंध राज्याचे लक्ष वेधले आहे.