Home आरोग्य “खासगी शिकवण्या वाल्यांनो, क्लास बंद ठेवा नाहीतर परिणाम वाईट होतील” : उपमुख्यमंत्री

“खासगी शिकवण्या वाल्यांनो, क्लास बंद ठेवा नाहीतर परिणाम वाईट होतील” : उपमुख्यमंत्री

0

ज्या शहरांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टयांचे आदेश दिले आहेत त्या शहरातील खासगी शिकवणी क्लासही बंद ठेवण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. जे कोणी क्लासेसवाले हे आदेश पाळणार नाहीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

अनेक जण सोबत एका ठिकाणी आल्यानंतर कोरोनाचा प्रसार झपाट्याने होऊ शकतो या उद्देशाने राज्यातील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत. मात्र शाळांशिवाय अनेक क्लासेसही आहेत जिथे मुलं रोज मोठ्या संख्येने जात असतात. उपमुख्यमंत्र्यांनी हीच गोष्ट लक्षात घेऊन सर्व प्रकारचे खासगी क्लास चालवणाऱ्यांना क्लास बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सरकारी आदेशाचं पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील दिला आहे. त्यामुळे क्लास बंद न ठेवता विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या क्लासवाल्यांवर सरकार कठोर कारवाई करणार आहे. दरम्यान, राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत, त्यामुळे राज्यात जमावबंदीचे देखील आदेश देण्यात आले असून नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे.