Home महाराष्ट्र पुणे मोदींनीच राफेलची कागदपत्रं जाळली असणार, अजित पवारांच्या मोदींवर आरोपांच्या फैरी

मोदींनीच राफेलची कागदपत्रं जाळली असणार, अजित पवारांच्या मोदींवर आरोपांच्या फैरी

0

प्राईम नेटवर्क : द हिंदू या इंग्रजी वृत्त पत्राच्या आधारे प्रशांत भूषण यांनी राफेल संदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर सरकारकडून राफेल संदर्भतील काही कागद पत्रे गहाळ झाल्याचं सांगण्यात आलं, यावरून हडपसर येथे झालेल्या सभेत, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींवर तोफ डागली आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनीच राफेलची कागदपत्रं जाळली असणार असं यावेळी म्हटलं.

त्यांना तसा अधिकार आहे का ?

भारतीय वायुदलाने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला, याच श्रेय भाजप घेत असल्याचा त्यांनी यावेळी घणाघात केला. भाजपचे नेते दहशतवादी किती मारले याचे आकडे जाहीर करत आहेत, त्यांना तसा अधिकार आहे का ? त्याच बरोबर पुलवामा येथे जवानांच्या गाड्यांवर स्फोटके भरलेली गाडी तेथे घुसलीच कशी ? असं अजित पवारांनी जाहीर सभेत म्हटलं आहे.