प्राईम नेटवर्क : अजित पवार यांच्या मुळशी येथील घोटवडे तालुक्यात आलेल्या फार्म हाऊसला रविवारी संध्याकाळी अचानक आग लागल्याने एकाच खळबळ उडाली. रविवारी संध्याकाळी अचानक आग लागल्याचं स्थानिकांनी पाहिल्या नंतर अग्निशमन दलाच्या सुरक्षा जवानांना पाचारण करण्यात आलं.
यावेळी फार्म हाऊसला लागलेल्या या आगीचं रूपांतर भीषण झालेलं पाहायला मिळालं. संपूर्ण परिसरात धुराचे लोट आणि साम्राज्य पाहायला मिळालं, मात्र जवानांनी शर्तीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. या बंगल्याचा न्यायालयीन वाद सुरु असल्याने हा बंगला काही दिवसांपूर्वी चर्चेत आला होता. दरम्यान या आगीत बंगल्याचं मोठं नुकसान झाल्याचं स्थानिकां कडून समजत आहे.