Home महाराष्ट्र अक्षय बोऱ्हाडे आणि सत्यशील शेरकर वाद संपुष्टात, एकमेकाला दिले आलिंगन

अक्षय बोऱ्हाडे आणि सत्यशील शेरकर वाद संपुष्टात, एकमेकाला दिले आलिंगन

0

थोड्या दिवसापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्वलंत झालेला आणि महाराष्ट्रभर गाजलेला अक्षय बोऱ्हाडे विरुद्ध सत्यशील शेरकर हा वाद अखेर निकाली लागला आहे. दोन्ही बाजूंकडून अगदी सामोपचारानं हा वाद मिटवण्यात आला आणि चक्क या दोघांची गळाभेट सुद्धा पहायला मिळाली.

जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक मनोरुग्ण आणि बेघर लोकांसाठी काम करणाऱ्या अक्षय बोऱ्हाडे आणि विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमव सत्यशील शेरकर यांच्यात हा वाद सुरु होता. सत्यशील शेरकर यांनी त्यांच्या बंगल्यावर नेऊन आपल्याला मारहाण केली तसेच आपल्या डोक्याला पिस्तुल लावून जिवे मारण्याचा प्रयत्न केला असा आरोप अक्षयनं केला होता.

दरम्यान, शिवऋणचे अक्षय बोहाडे याने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून समाज माध्यमात व्हायरल केलेल्या व्हिडीओमध्ये आपणास अमानुष मारहाण झाल्याचे म्हटले होते. त्यावर राज्यभरातून त्यास अनेक शिवप्रेमींनी प्रतिक्रीया देऊन पाठिंबा दर्शवला होता.

तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव असताना अनेकजण शिरोली बुद्रुक येथे आले होते. त्यानंतर शेरकर यांनी पत्रकार परिषद
घेऊन त्याबाबत खुलासा करताना मारहाणीच्या आरोपांचे खंडन केले होते. देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून ग्रामीण भागात तो पसरू नये यासाठी गावपातळीवर आम्ही खबरदारी घेत असून, अक्षयच्या संस्थेत नव्याने काही मनोरूग्ण दाखल होत असल्याचे समजल्याने त्यास ग्रामस्थांनी शेरकर यांच्या घरी समज देण्यासाठी बोलावून घेतले होते. या घटनेचा विपर्यास करून अक्षयने आपल्यावर मारहाणीचे आरोप केल्याचे शेरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले.