Home आरोग्य शाळा सुरु होण्यापूर्वी शासनाकडून शिक्षकांची मोफत कोरोना चाचणी होणार!

शाळा सुरु होण्यापूर्वी शासनाकडून शिक्षकांची मोफत कोरोना चाचणी होणार!

0

येत्या सोमवारपासून अर्थात २३ नोव्हेंबरपासून राज्यभरातील इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरु होत आहेत. तत्पूर्वी कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी बऱ्याच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यातच शिक्षकांची कोरोना चाचणी मोफत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच सर्व शाळांमध्ये तापमान मापक उपलब्ध करून दिल्या जात आहेत व शाळांचे निर्जंतुकीकरण सुद्धा केले जात आहे.

२३ नोव्हेंबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार असल्याने सर्व शाळांचे निर्जंतुकीकरण व इतर प्रतिबंध करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर सोपवण्यात आली आहे. शिक्षण विभागाने सर्व शिक्षकांना २२ नोव्हेंबरपर्यंत कोरोना चाचणी करून घेण्यास सांगितले आहे व आता सर्व शिक्षकांसाठी ही चाचणी शासकीय केंद्रांमध्ये मोफत करून मिळणार असल्याचेही मीडिया न्यूजमधून सांगितले जात आहे.