केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी देशातील सर्व शैक्षणिक संस्था या १५ ऑगस्ट पासून सुरू करणार असल्याचे संकेत दिले आहेत. पालक विद्यार्थी यांना शाळा कॉलेज कधी सुरू होतील याचा पेच पडला होता , लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर देशातील सर्व शाळा कॉलेज हे अनिश्चित कालावधी साठी बंद करण्यात आले होते.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांनी पोखरियाल यांना शाळा सुरू करण्याच्या उपाय योजनांविषयी पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी म्हटले होते की , ” आता कोरोनाच्या अस्तित्वाला नाकारत आपण शैक्षणिक संस्था पुनःश्च एकदा सुरू करण्याची वेळ आली आहे, असे करत असताना शाळांना आपल्याला साहसी भूमिकांसाठी तयार करावेच लागेल अन्यथा ती घोडचूक ठरेल. मुलांना जबाबदार बनवणे हे शाळेचे मूलभूत कार्य आहे. मार्च पासून शाळा बंद असून त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे, ऑनलाइन शिक्षण हा यावरचा पर्याय असू शकत नाही कारण ते सर्वाना सहज उपलब्ध नाही, यामुळे लवकरात लवकर शाळांना सुरवात करा”
दरम्यान देशामध्ये वैद्यकीय शिक्षणाची सामायिक परीक्षा NEET ही २६ जुलै रोजी आयोजित करण्यात येणार असल्याचे जाहीर झाले आहे. यावर्षी १५ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देतील. कोरोना संकटामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक अंतर ठेवणे बंधनकारक राहील. यामुळे परीक्षा केंद्राची संख्या दुप्पट केली जाईल, असेही पोखरियाल यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. परिक्षेवरील अनिश्चिततेचे सावट त्यामुळे हटले आहे.