Home तंत्रज्ञान मनसेची मागणी पूर्ण; अमेझॉन ऍप लवकरच मराठीत येणार

मनसेची मागणी पूर्ण; अमेझॉन ऍप लवकरच मराठीत येणार

0

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाराष्ट्रात ऑनलाईन विक्रीतून मोठी कमाई करत असलेल्या अमेझॉन व फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स वेबसाईट्सला त्यांचे ऍप मराठीत उपलब्ध करण्याची सूचना केली होती. सध्या महाराष्ट्रात सणासुदीचे वातावरण असून अमेझॉन फ्लिपकार्टवर सेल चालू आहे. त्यामुळे या ऍप्सचा बिजनेस चांगलाच वाढला आहे. परंतु महाराष्ट्रात इतका व्यापार करत असूनही हे ऍप्स मराठीत नसल्याने ते मराठीत उपलब्ध करण्याची मागणी मनसेने केली होती. तसेच १५ दिवसांत असे न केल्यास त्यांना महाराष्ट्रात विक्री करू देणार नाही असा इशाराही मनसेने दिला होता. मनसे कामगार सेनेचे सरचिटणीस अखिल चित्रे यांनी याबाबतचे ट्विट केले होते.

तसेच याबाबतचे पत्र त्यांनी अमेझॉनचे भारतीय सीईओ अमित अग्रवाल यांना पाठवले होते.

ही मागणी अमेझॉनने मान्य केली असून लवकरच अमेझॉन ऍप मराठीत आणण्याचा निर्णय घेतला आहे. अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी या प्रकरणाची दखल घेऊन त्यांच्या भारतीय प्रतिनिधींद्वारे अमेझॉन ऍप लवकरच मराठीत आणणार असल्याची माहिती दिली तसेच आधी ऍप मराठीत आणले नसल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. याशिवाय फ्लिपकार्टनेही आठवड्याभरात आपले ऍप मराठीत उपलब्ध करण्याचे आवाहन केले आहे.