देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अर्थात अमृता फडणवीस गेल्या काही दिवसांपासून ट्विटरवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर एका पाठोपाठ एक टीकेचे बाण डागत आहेत मात्र आता मुख्यमंत्री ठाकरे अमृता फडणवीस यांना एक जोरदार धक्का देण्याची तयारीत आहेत अशी माहिती मिळत आहे. फडणवीस यांच्या पत्नी ऍक्सिस बँकेत व्हाईस प्रेसिडेन्ट पदावर कार्यरत आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर असताना पोलिसांची खाती अँक्सिस बँकेत वळवण्यात आली होती. मात्र ठाकरे सरकार त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवणार आहेत.
ठाकरे सरकार पोलीस कर्मचाऱ्यांची ऍक्सिस बँकेतील खाती लवकरच राष्ट्रीयकृत बँकेत वळवण्याचा निर्णय घेणार अशी माहिती मिळत आहे. ऍक्सिस बँकेत पोलिसांची सुमारे दोन लाख खाती आहेत ज्यात वर्षाकाठी ११ हजार कोटी रुपये बँकेत जमा होतात जर ही खाती बंद झाली तर ऍक्सिस बँकेला व महत्वाचं म्हणजे अमृता फडणवीसांना मोठा धक्का बसणार आहे.