Home महाराष्ट्र आता मी बोलणारच नाही, अण्णांचं आता मौन व्रत, पुन्हा आंदोलन करणार…

आता मी बोलणारच नाही, अण्णांचं आता मौन व्रत, पुन्हा आंदोलन करणार…

0

प्राईम नेटवर्क : जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी लोकपाल सह शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांवर ५ ते ६ दिवस अन्न त्याग करून उपोषण केलं, मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी मागण्या मान्य केल्याचं सांगत मुख्यत्र्यांच्या साक्षीने अण्णांनी फळांचा रस घेत उपोषण सोडलं. मात्र केंद्रीय कृषी मंत्रालया कडून अद्याप त्यांना मागण्या पूर्ण झाल्या बद्दल लेखी पत्र मिळालं नसल्याचं सांगत अण्णा हजारे यांनी,आता मौन व्रत धारण करत आंदोलन करणार असल्याचं सांगितलं आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याचं अद्याप आपल्याला पात्र मिळालं नसल्याचं सांगत पुढील दोन दिवसात आपण मौन व्रत धारण करून आंदोलन करणार असल्याचं अण्णांनी यावेळी सांगितलं. यावेळी अण्णा लिखित पत्रावर अडून बसल्याच दिसून आलं.

यावेळी अण्णांनी २०१३ मधील त्यांच्या सोबत असलेल्या ‘टीम अण्णां’ वर देखील टीका केली, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उद्देशून त्यावेळी कुणाच्या डोक्यात मुख्यंमत्री, तर कुणाच्या डोक्यात राज्यपाल शिरला होता, त्यामुळे आमचं आंदोलन यशस्वी होऊ शकलं नाही. असं यावेळी अण्णांनी सांगितलं.