Home महाराष्ट्र महाविकास आघाडीच्या खातेवाटपाची आज संध्याकाळ पर्यंत होणार घोषणा

महाविकास आघाडीच्या खातेवाटपाची आज संध्याकाळ पर्यंत होणार घोषणा

0

महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय अखेर सोमवारी झाला. मीडिया न्यूजनुसार अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची तर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या एकुण २५ आमदारांनी मंत्रिपदाची आणि १० नेत्यांनी राज्यमंत्रिपदा शपथ घेतली. यात बऱ्याच नव्याने निवडून आलेल्या आमदारांना मंत्रीपदे मिळाली तर काही जुन्या नेत्यांना वगळण्यात आले अशी मीडिया न्यूज आहे.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर ज्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते ते खातेवाटपही अखेर पार पडले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांसोबत घेतलेल्या बैठकीत खातेवाटप निश्चित करण्यात आले असून आज संध्याकाळपर्यंत ते जाहीर केले जाईल अशी शक्यता आहे. अद्याप कुठलीही खात्रीशीर माहिती मिळाली नसून लोकमतच्या एका वृत्तानुसार ‘गुरुवारी संध्याकाळ पर्यंत खातेवाटप जाहीर करण्यात येईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल सांगितले होते.’ खातेवाटप जाहीर झाले नसले तरी सर्व कॅबिनेट मंत्र्यांना शासनाने बंगल्याचे वाटप केले आहे. अजित पवार यांना मलबार हिलमधील देवगिरी बंगला मिळाला आहे तर आदित्य ठाकरे यांना मंत्रालयाजवळील अ-६ हा बंगला मिळाला आहे.