Home महाराष्ट्र …माफी मागावी अन्यथा महाराष्ट्रात पाऊल ठेवू देणार नाही : जितेंद्र आव्हाड यांचा...

…माफी मागावी अन्यथा महाराष्ट्रात पाऊल ठेवू देणार नाही : जितेंद्र आव्हाड यांचा इशारा

0


योग गुरू रामदेव बाबा यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस व आमदार जितेंद्र आव्हाड चांगलेच संतापले आहेत. बाबा रामदेव यांनी आपल्या एका वक्तव्यात पेरीयार रामास्वामी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वैचारिक दहशतवादी म्हटलं होतं. दरम्यान यावर संतप्त होऊन आव्हाड यांनी बाबा रामदेव यांच्यावर हल्लाबोल करत माफी मागण्याचा इशारा दिला आहे.

ज्या महापुरुषांनी भारतासाठी भारताच्या हितासाठी अनेक महान कार्ये केली. बाबसाहेबांनी आपल्याला देशातील प्रत्येक जाती धर्माच्या नागरिकांच्या हक्कासाठी संविधान दिल तर पेरीयार रामास्वामी सर्व जाती धर्म समानतेसाठी लढले अशा महापुरुषांना वैचारिक दहशतवादी म्हणणाऱ्या बाबा रामदेव याना महाराष्ट्रात पाऊलही ठेऊ देणार नाही’ असा सणसणीत फटका जितेंद्र आव्हाड यांनी बाबा रामदेव यांना बुधवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला. त्याचबरोबर बाबा रामदेव यांना एकेरी नावाने बोलत माफी मागण्याचाही आव्हाड यांनी इशारा दिला आहे.