अभिनेत्री सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, अकुंश चौधरी, सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक कलाकारांनी सकाळी १०:३० ते ११ च्या दरम्यान #पुन्हानिवडणूक हा हॅशटॅग वापरत ट्विट केले आहेत. परिणामी राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरला आहे. धनंजय मुंडे यांनी तर सोनाली, सई, अंकुश आणि सिद्धार्थ यांना टॅग करून जनतेची माफी मागावी असं ट्विट केलं आहे.
मुंडे आपल्या ट्विट मध्ये म्हणाले, “काही कलाकारांनी #पुन्हानिवडणूक हा ट्विटर ट्रेंड सुरू केला आहे. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांनी जनतेची माफी मागावी. कलाकारांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीचं भान ठेवावं. या ट्रेंडमुळे लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.”