Home महाराष्ट्र माजी नेव्ही अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी भाजपकडून महाराष्ट्र सरकारची ईस्ट इंडिया कंपनीशी तुलना!

माजी नेव्ही अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी भाजपकडून महाराष्ट्र सरकारची ईस्ट इंडिया कंपनीशी तुलना!

0

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र काढल्याबद्दल शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना जबर मारहाण केली होती. यावरून विरोधी पक्ष असलेला भाजप महाविकास आघाडी सरकारवर सडेतोड टीका करत आहे. भाजप आमदार ऍड. आशिष शेलार यांनी या प्रकरणावर बोलतांना सरकारची तुलना ईस्ट इंडिया कंपनीशी केली.

या घटनेनंतर माजी सैनिकाला मारहाण केल्याप्रकरणी शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता व त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र त्यांना जामीन मिळून आता सुटका झाली असल्याने आशिष शेलारांनी ट्विट करून यावर टीका केली. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणाले की, “मुंबई बाँम्बस्फोट आरोपी याकूब मेमनची कबर वाचविण्यासाठी अजामीनपात्र गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि आता देशप्रेमी निवृत्त नेव्ही अधिकारी मदन शर्मांना मारहाण करणाऱ्यांवर जामिनपात्र साधा गुन्हा नोंदवला गेला.” तसेच ‘हे विकास आघाडी सरकार आहे की तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी’ असा टोलाही त्यांनी सरकारला दिला.