Home महाराष्ट्र पुणे दापोडी येथे अग्निशामक दलाचा एक जवान मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून शहीद

दापोडी येथे अग्निशामक दलाचा एक जवान मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून शहीद

0

गेल्या काही दिवसांपासून शासनाच्या ‘अमृत’ योजनेंतर्गत दापोडी येथे ड्रेनेज लाइन टाकण्याचे एक मोठे काम महापालिका ठेकेदारामार्फत करून घेत होती. या कामा दरम्यान दापोडी येथील विनियार्ड चर्च शेजारच्या पाण्यांच्या टाक्यांजवळ तीस फूट खोल, पाच फूट रुंद तर ३० फूट लांबीचा खड्डा खोदण्यात आला आणि याच खड्ड्यात काम करतांना जमादार आणि त्यांचे सहकारी अंगावर भुसभुशीत माती पडून ते मातीखाली गाडले गेले. त्यांना काढण्यासाठी दोन स्थानिक युवक खड्ड्यात उतरले. मात्र या दोघांच्याही अंगावर माती कोसळली. शेवटी अग्निशामक दलाला कळवण्यात आले आणि तातडीने एक अग्निशामक गाडी तिथे येऊन ठेपली. दबलेल्या कामगारांना काढण्यासाठी ‘एनडीआरएफ’ व ‘सीएमई’च्या जवानांकडून रात्री उशिरापर्यंत शर्तीचे प्रयत्न चालू होते.

अग्निशामक दलाचे मदत कार्य चालू असतांना, बडगे व सुरवसे या दोघांना बाहेर काढले. तेव्हा खड्याशेजारी आजूबाजूला बघ्यांची तुडूंब गर्दी जमली होती. त्यामुळे मातीचा मोठा ढिगारा खड्यात ३ अग्निशामक दलाचे जवान व जमादारावर कोसळला. घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी ताबडतोब पोलिसांना व इतर अग्निशामक दलांना तात्काळ माहिती दिली व पुढच्या काही क्षणात तिथे १० अग्निशामक गाड्या व ५ रुग्णवाहिका आल्या. अग्निशमन विभागाच्या तीन जवानांना बाहेर काढण्यात आले तर नागेश जमावदार नामक कामगार मातीखाली गाडला गेला. काढलेल्या जवानांना ताबडतोब दवाखान्यात हलवण्यात आले. मात्र त्यापैकी विशाल जाधव यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. इतर जवानांवर उपचार चालू असून एका जवानाची परिस्थिती गंभीत असल्याची माहिती मिळत आहे.