कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातले आहे. याचाच फटका औरंगाबाद येथील उद्योगधंद्यांना सुद्धा बसला आहे. मराठवाडा शेती आणि उद्योगधंद्यांचे माजी अध्यक्ष प्रसाद कोकीळ म्हणाले, “औरंगाबाद मध्ये ४००० च्या वर उद्योग आहेत, त्यातले बहुतेक लोक चीनमधून अवजारे व उपकरणे आयात करतात. पण चीन मधील कोरोनाच्या उद्रेकामुळे आयात करणे मुश्किल झाले आहे.”
या गोष्टीला दुसऱ्या बाजूने बघायचे झाल्यास देशी अवजारे व उपकरणे बनवणाऱ्या उद्योजकांसाठी ही सुवर्णसंधी आहे असेही त्यांनी नमूद केले.
एम पी शर्मा यांच्यानुसार सौर ऊर्जा उद्योगांना चीनमधील अवजारांशिवाय उपाय नाही. तरी सुद्धा ही उपकरणे तैवान आणि व्हिएतनाम मधून काही प्रमाणात आयात करण्यात त्यांना यश आले आहे.