Home महाराष्ट्र औरंगाबाद औरंगाबाद मध्ये कोरोणाची शंभरी पार!

औरंगाबाद मध्ये कोरोणाची शंभरी पार!

0

सोमवारी औरंगाबादमध्ये २९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर मंगळवारी दुपारपर्यंत आणखी १३ रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यामुळे मराठवाड्याची असलेली राजधानी आता अचानक कोरोनाचं हॉटस्पॉट बनू लागली आहे.

औरंगाबाद जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. कुलकर्णी यांच्या माहितीनुसार, शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या आता १०५ वर पोहोचली आहे, तर सहा कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू सुद्धा झालाय.औरंगाबादमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा अचानक का वाढला, याबाबत औरंगाबाद महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडे सांगतात, “कोरोनाग्रस्तांची संख्या वाढण्यामागचं प्रमुख कारण, म्हणजे चाचण्यांच्या क्षमतेत झालेली वाढ आहे. महापालिकेकडून पहिल्यापेक्षा जास्त कोरोना संशयीतांच्या चाचण्यात केल्या जात आहेत. कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्यांचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे. महापालिकेची विशेष पथकं कोरोना संशयीत रुग्णांचा शोध घेत आहेत.”

डॉ. कुलकर्णी यांनी अजून पुढे म्सांगितले की, “शहरात ज्या भागांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या जास्त आढळून आली आहे, अशा हॉटस्पॉटमध्ये डोअर-टू-डोअर जाऊन तपासणी केली जात आहे. कोरोनाबाधित रुग्णांची लवकर ओळख पटली तर त्यांच्यावर योग्यवेळी उपचार होतील. ज्यामुळे रुग्ण कोरोनामुक्त होण्याची संख्या वाढण्यास मदत होईल.”

याबाबत औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडिले म्हणाले, “शहरातील कोरोनाग्रस्तांची वाढणारी संख्या लक्षात घेता संचारबंदी कडक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मंगळवारी शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई सुद्धा करण्यात आली.दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, हॉटस्पॉट परिसरातील नागरिक प्रशासनाला सहकार्य करत नाहीत. एरिया सील केल्यानंतरसुद्धा घराबाहेर पडतायत. यामुळे संसर्ग पसरण्याची भीती आहे. प्रत्येकामागे पोलीस लावणं शक्य नाही. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य केल्यावरच कोरोनावर विजय मिळवणं शक्य होईल.”