Home महाराष्ट्र पुढील विधानसभेत राज्यात वंचित बहुजन आघाडीचा विरोधी पक्षनेता असणार : मुख्यमंत्री फडणवीस

पुढील विधानसभेत राज्यात वंचित बहुजन आघाडीचा विरोधी पक्षनेता असणार : मुख्यमंत्री फडणवीस

0
devendra fadnavis

प्राईम नेटवर्क : मुख्यमंत्री आणि भाजपची महाजानदेश यात्रा नांदेड मध्ये पोहचली असताना, मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, या वेळी पत्रकारांनी वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम असल्याचा आरोप काँग्रेस राष्ट्रवादी कडून होत असल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगितलं. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी, काँग्रेस राष्ट्रवादीला टोला लगावत, वंचित बहुजन आघाडी हि बी टीम वरून ए टीम झाली आहे, काँग्रेस राष्ट्रवादीची सध्याची अवस्था पाहता, येत्या काही काळात विधानसभेत विरोधी पक्षनेता वंचित बहुजन आघाडीचा असेल असं भाकीत वर्तवलं.

राष्ट्रवादी मधून नेत्यांची होत असलेल्या गळती वर बोलताना, मुख्यमंत्री म्हटले, शरद पवारांची राष्ट्रवादी ची ताकद फक्त पश्चिम महाराष्ट्रा पूर्ती मर्यादित होती, नेत्यांच्या गळतीमुळे ती ताकद आता काही जिल्ह्यां पर्यंत मर्यादित राहिली आहे.

पत्रकारांनी यावेळी आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील आणि ते वरळीतून निवडणूक लढवणार असल्याचं शिवसेनेचे अनिल परब यांनी जाहीर केल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगताच, “अनिल परब हे शिवसेनेचे अधिकृत प्रवक्ते आहेत का ?” असा उलट प्रश्न मुख्यमंत्री फडणवीसांनी पत्रकारांना विचारला ?

नारायण राणेंना भाजप मध्ये घेणार का कि नुसतीच चर्चा होणार यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं, सध्या नारायण राणे हे भाजप कडूनच खासदार आहेत, ते भाजपचे खासदार आहेत, त्यांचा पक्ष भाजपमध्ये कधी विलीन करायचा याचा निर्णय आमचा मित्र पक्ष शिवसेनेशी बोलून घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

आदित्य ठाकरे या मतदार संघातून निवडणूक लढवतील आमदार अनिल परब यांनी केलं जाहीर

राष्ट्रवादीच्या नेत्यांना उदयनराजेंचा टाटा ! शिवस्वराज्य यात्रेला उदयनराजेंची दांडी !