Home महाराष्ट्र वाढीव विजबिलामुळे भाजपचे आज वीज बिल होळी आंदोलन!

वाढीव विजबिलामुळे भाजपचे आज वीज बिल होळी आंदोलन!

0

लॉकडाऊनच्या काळात वाढीव वीज बिलं आकारण्यात आले असल्यामुळे राज्यातील लोक तसेच राजकीय पक्ष संतप्त आहेत. राजकीय पक्षांनी वारंवार राज्य सरकारला वीज बिल कमी करण्याची मागणी केली. मात्र राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याने विरोधी पक्ष आता आक्रमक भूमिका घेत आहेत. आज २३ नोव्हेंबरला भाजप राज्यभर वीज बिल होळी आंदोलन करणार आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे. चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करून भाजपच्या वीज बिल होळी आंदोलनाची माहिती दिली. याशिवाय मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील सरकारला वीज बिलाबाबत निर्णय घेण्यासाठी कडक शब्दांत ताकीद दिली आहे. तसेच येत्या सोमवारपर्यंत याबाबत निर्णय न घेतल्यास २६ नोव्हेंबरला आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.