Home महाराष्ट्र मोठी बातमी; उद्यापासून आंतरजिल्हा बस सेवा होणार सुरू!

मोठी बातमी; उद्यापासून आंतरजिल्हा बस सेवा होणार सुरू!

0

कोरोनाच्या संकटामुळे देशभरात गेल्या ५ महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील परिवहन महामंडळाची बस सेवा देखील २३ मार्च पासून बंद होती. २२ मे पासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असलेल्या भागांमध्ये जिल्हांतर्गत बस वाहतूक सुरू करण्यात आली होती. मात्र महाराष्ट्रात आता गणपती, गौरी, नवरात्री, दसरा असे मोठमोठे सण पुढ्यात असल्याने प्रवाश्यांची संख्या व वाहतुकीची गरज वाढणार आहे. ही बाब लक्षात घेऊन उद्यापासून अर्थात २० ऑगस्टपासून आंतरजिल्हा वाहतूक व बस सेवा सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तसेच या प्रवासासाठी आता पासची देखील आवश्यकता नसणार आहे त्यामुळे प्रवाश्यांना दिलासा मिळाला आहे.

राज्यातील ग्रामीण भागात पोहचण्यासाठी प्रवासाचे मुख्य साधन असलेली एसटीच बंद असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. तसेच जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी नागरिकांना खासगी गाड्यांसाठी अवाढव्य भाडे भरावे लागत होते. अवघ्या ३ दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी बऱ्याच लोकांना प्रवासाची आवश्यकता भासणार आहे. याकरिता एसटी बसेस सुरू करण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर चालू होती. ही मागणी अखेर मान्य झाली असून उद्यापासून बससेवा चालू होणार असल्याचे समजते.