Home महाराष्ट्र भाजपच्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर, या नेत्यांची नावे अजूनही नाहीत

भाजपच्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर, या नेत्यांची नावे अजूनही नाहीत

0

विधानसभा निवडणुका केवळ २ आठवड्यांवर आल्याने सर्वच राजकीय पक्षांची धावपळ सुरू आहे. आज उमेदवारीसाठी अर्ज भरण्याची शेवटचा दिवस असून देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह अनेक नेते आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. भाजपने आज उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली असून या यादीत सात उमेदवारांची नावे आहेत. तसेच ही यादी जाहीर झाल्यानंतर काही अनपेक्षित गोष्टी समोर आल्या आहेत.

भाजपच्या पहिल्या तीन याद्यांमध्ये देखील नाव आले नसलेले एकनाथ खडसे यांचे चौथ्या यादीतही नाव नसून त्यांची मुलगी रोहिणी खडसे हिचे मुक्ताईनगर मतदारसंघासाठी नाव आले आहे. याशिवाय प्रकाश मेहता, विनोद तावडे, राज पुरोहित या नेत्यांचे देखील अजूनही कुठल्याच यादीत नाव आलेले नाही. तर विनोद तावडे यांच्या जागी सुनील राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे असे मीडिया न्यूज वरून समजले. आता या नेत्यांना उमेदवारी मिळणार की नाही यावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे.