Home महाराष्ट्र भाजप अध्यक्षांची नवी टीम जाहीर; महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांना मोठी पदे; खडसेंना पुन्हा...

भाजप अध्यक्षांची नवी टीम जाहीर; महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांना मोठी पदे; खडसेंना पुन्हा डावलले

0

भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी नुकतीच पक्षाच्या नव्या टीमची घोषणा केली आहे. नॅशनल सेक्रेटरी म्हणून एकूण १३ जणांची नेमणूक करण्यात आली आहे. या १३ जणांमध्ये महाराष्ट्रातील ४ नेत्यांना जबाबदाऱ्या मिळाल्या आहेत. त्यात विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुनील देवधर, विजया रहाटकर यांचा समावेश आहे.

याशिवाय खासदार हिना गावित यांना राष्ट्रीय प्रवक्त्यांच्या यादीत जागा मिळाली आहे तसेच जमाल सिद्दीकी यांना अल्पसंख्याक मोर्चाचे नेते म्हणून जागा देण्यात आली आहे.

भाजप नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा पक्षाने डावलले आहे. विधानसभेच्या वेळीही खडसेंना पक्षाकडून डावलले गेले होते. आता केंद्राने सुद्धा खडसेंकडे दुर्लक्ष केल्याचे समजते.