Home महाराष्ट्र भुसावळ येथे भाजप नगरसेवकाच्या निवासस्थानी गोळीबार; कुटुंबातील चौघांचा मृत्यू

भुसावळ येथे भाजप नगरसेवकाच्या निवासस्थानी गोळीबार; कुटुंबातील चौघांचा मृत्यू

0

विधानसभा निवडणुका तोंडावर असतांना राज्यात अनेक अनपेक्षित घटना घडत आहेत. याचेच उदाहरण म्हणजे भुसावळ येथे रात्री भाजप नगरसेवक रवींद्र खरात यांच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या हल्ल्यात रवींद्र यांच्या कुटुंबातील ते स्वतः मिळून ४ जणांचा मृत्यू झाला आहे तर इतर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. तरी हे हल्लेखोर कोण होते व त्यांनी हल्ला का केला हे अद्याप निष्पन्न झालेले नाही.

गेल्या रात्री १०.४५ च्या सुमारास भुसावळ मधील समता नगर येथे राहत असलेल्या रविंद्र खरात यांच्या घरात येऊन अज्ञात इसमांनी गोळीबार केला. या गोळीबारात त्यांचे भाऊ सुनील खरात व मुलगा सागर खरात यांचा गोळी लागून जागीच मृत्यू झाला तर रविंद्र आणि त्यांचा मुलगा रोहित यांना उपचारासाठी दवाखान्यात नेले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला. याशिवाय त्यांचा तिसरा मुलगा हितेश, पत्नी रजनी आणि अजून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू असून पोलीस सदर हल्लेखोरांच्या शोधात आहेत.