महाराष्ट्राच्या महानाट्यमय राजकारणावर सोमवारी झालेल्या सुनावणीत उभय पक्षांकडून तब्बल ८० मिनिटे ‘राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान देता येत नसल्याचा’ युक्तिवाद चालू होता. पुढे न्यायालयाने याबाबत आज अर्थात मंगळवारी निर्णय देण्याचे स्पष्ट केले होते आणि आज अखेर यावर निकाल आला असून, भाजपची चांगलीच दमछाट होणार असं दिसतंय. कारण आज अर्थात मंगळवारी झालेल्या सुनावणीनुसार न्यायालयाने भाजप सरकारला उद्या अर्थात बुधवार दिनांक २६ नोव्हेंबर सायंकाळी ५.०० पर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. म्हणजे आता या महानाट्याच्या शेवट विधानसभेतच होणार हे निश्चित!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या मते बहुमत चाचणी ३० नोव्हेंबरला व्हावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र महाशिवाघाडीला हे मान्य नव्हते. महाशिवाघाडी नुसार ‘राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा लवकरात लवकर सोडवण्यासाठी पुढील २४ तासात बहुमत तपासणी व्हायला हवी.’ न्यायालयाने महाशिवाघाडीची ही विनंती मान्य करून ‘उद्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत आमदारांचा शपथविधी संपवून बहुमत सिद्ध करावे असे आदेश दिले. त्याचबरोबर उद्या विधानसभेत होणाऱ्या या सर्व घडामोडींचं थेट प्रक्षेपण (लाईव्ह चित्रिकरण) प्रसार माध्यमांवर करण्यात यावे यासाठी हंगामी व स्थायी अध्यक्षांची नियुक्ती करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.