Home महाराष्ट्र पुणे “राज्यात ठाकरे सरकारने दिलेली कर्जमाफी ही फसवी” भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची...

“राज्यात ठाकरे सरकारने दिलेली कर्जमाफी ही फसवी” भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची टीका

0

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पुणे दौर्‍यावर आलेले असताना एका प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले की, “नागपूर मध्ये हिवाळी अधिवेशनात शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘शेतकर्‍यांची कर्जे माफ करू’ अशी घोषणा केली होती. मात्र ती फसवी आहे हे मला सरकारच्या निर्णयावरून दिसून आले आहे” एकंदरीत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली आहे.

त्याच बरोबर पाटील म्हणाले “जर युती सरकारच्या काळात माजी जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार दोषी होते तर मग आता निर्दोष कसे?” असा सवालही त्यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अजित पवार यांना क्लीन चिट दिली. यावर विरोधीपक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘अजित पवारांची क्लीन चीट ही दिशाभूल करणारी’ असल्याचा आरोप सरकारवर केला होती. फडणवीसांच्या त्याच टिकेला दुजोरा देत चंद्रकांत पाटील यांनी आता क्लीन चीट देण्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. अशी माहिती पुढारी वृत्तपत्राच्या एका रिपोर्ट नुसार मिळाली.