Home महाराष्ट्र आता पुन्हा “एक मराठा लाख मराठाची हाक”, मराठा क्रांती मोर्चा ९ ऑगस्ट...

आता पुन्हा “एक मराठा लाख मराठाची हाक”, मराठा क्रांती मोर्चा ९ ऑगस्ट पासून

0

मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल राज्य सरकारकडून योग्य प्रयत्न केले जात नाहीत. समाजाच्या अनेक मागण्या पूर्ण प्रलंबित आहेत. त्या मान्य करा, अन्यथा 9 ऑगस्टपासून मराठा समाज राज्यव्यापी आंदोलन सुरू करेल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चातर्फे देण्यात आला आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांची ऑनलाइन बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली. प्रलंबित मागण्यांचा आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आला. यावेळी वीरेंद्र पवार, विनोद पाटील, राजेंद्र कोंढरे, धनंजय जाधव, दिलीप पाटील, विनोद साबळे, अंकुश कदम, करण गायकर, माउली पवार व इतर विविध जिल्ह्यांतील प्रमुख समन्वयकांची उपस्थिती होती.

मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या बाजूने निकाल लागल्यानंतर आता ७ जुलैला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यापार्श्वभूमीवर राज्य शासनाने पूर्ण ताकदीनिशी मराठा आरक्षणाची बाजू मांडावी, असा ठराव मराठा क्रांती मोर्चाच्या शनिवारी (दि.२७) झालेल्या ऑनलाईन बैठकीत मांडण्यात आला. त्याचप्रमाणे मराठा आंदोलकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सरकारने त्वरित पूर्ण करावी, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळमार्फत थेट कर्ज देण्याची प्रक्रिया राज्य सरकारने सुरू करावी व त्यासाठी वाढीव निधीची तरदूद करण्याची मागणी यावेळी पुढे आली. ४७ दिवस आजाद मैदानावर २०१४ इएसबीसी उमेदवारांचा विषय सरकारने तात्काळ मार्गी लावण्यासाठी सरकारकडे मागणी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. खोट्या अ‍ॅट्रॉसिटीच्या घटनांबाबत सुद्धा याबैठकीत गांभीर्याने चर्चा झाली