प्राईम नेटवर्क : राज्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी देणारी घटना काल (शनिवारी) घडली. देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आज राजभवनात हा शपथविधी पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली.
यावेळी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वा कडून केंद्रीय विधी व न्याय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेत, काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतला, यावेळी शिवसेनेवर बोलताना रवी शंकर प्रसाद म्हणाले, शिवसेनेने या पुढे छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा वापरू नये, मात्र बोलण्याच्या ओघात त्यांच्या कडून शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख झाला, मात्र हि चूक त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी छत्रपती शिवाजी असा उल्लेख केला, या देशात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्याचा अधिकार कोणालाही नाही, त्यामुळे त्यांनी यावर तात्काळ माफी मागावी अशी मागणी खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
आचार विचार नसलेल्या राजकारण्यांनी महाराजांचं नाव घेऊ नये, त्यामुळे केंद्रीय विधी व न्याय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी तात्काळ माफी मागावी असं संभाजी महाराज यांनी म्हटलं आहे.
दरम्यान राजकीय वर्तुळात आज पवार कुटूंबाचीच चर्चा चालू असून सुप्रिया सुळे यांनी ‘अजित पावरांशी संबंध संपले’ असं सांगितलं आहे. आता राष्ट्रवादीच्या मदतीशिवाय अजित पवार किती आमदार जमवू शकतील आणि बहुमत सिद्ध करू शकतील का? यावर सबंध राज्याचे लक्ष वेधले आहे.