Home खेळ स्पर्धा छत्रपती संभाजी महाराजांनी घेतली विराट कोहलीची भेट; रायगडावर जाण्याची कोहलीची इच्छा

छत्रपती संभाजी महाराजांनी घेतली विराट कोहलीची भेट; रायगडावर जाण्याची कोहलीची इच्छा

0

भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका या सामन्याच्या निमित्ताने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आज पुण्यात होता. या सामन्यानंतर भारतीय क्रिकेट निवड समितीचे सदस्य जतीन परांजपे यांनी संभाजीराजे आणि विराट कोहली यांची भेट करून दिली अशी माहिती संभाजीराजे यांनी केलेल्या ट्विट वरून समजली.

छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या ट्विट मध्ये नमुद केल्यानुसार ते विराट कोहलीसोबत महाराष्ट्राच्या क्रिकेटवर बोलले. तसेच त्यांनी सांगितले की, “जतीन परांजपे यांनी विराटला आमच्या भेटीआधी मी गडकोटांसाठी करत असलेल्या कामाची माहिती दिली असणार, कदाचित त्यामुळे विराटने रायगडला जाण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच येत्या काळात ‘महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या’ माध्यमातून महाराष्ट्राच्या तळागाळातील टॅलेंटेड खेळाडूंना संधी मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी ट्विटमधून सांगितले.